'लाचलुचपत विभागाकडून कोणतीही चौकशी नाही'

लाचलुचपत विभागानं आपली कोणतीही चौकशी केली नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी दिलं आहे. 

Updated: Sep 20, 2017, 08:08 PM IST
'लाचलुचपत विभागाकडून कोणतीही चौकशी नाही' title=

नाशिक : लाचलुचपत विभागानं आपली कोणतीही चौकशी केली नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी दिलं आहे. नाशिकमध्ये एकनाथ खडसे लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसेंची चौकशी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण खडसेंनी या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

नाशिकमधल्या लाचलुचपत विभागामध्ये एकनाथ खडसे जवळपास एक ते दीड तास होते. लाचलुचपत विभागामध्ये आपण कागदपत्र घेण्यासाठी गेलो असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.