जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर या अध्यक्षा आहेत. त्यामुळे बॅंकेच्या कामकाजाबाबत खडसेंना विशेष कौतूक वाटतंय.
जेवणावळी, वाहने यावर होणाऱ्या वायफळ खर्चावर बँकेने अंकुश लावल्याचं खडसेंनी बँकेच्या १०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हटलं आहे.
दरम्यान, एखाद्या संस्थेत चांगलं चाललं असलं तर काही लोकांना तेही पाहवत नाही त्यांना मळमळ झाल्यासारखं होतं असा टोलाही खडसे यांनी यावेळी लगावला आहे.