योगेश खरे नाशिक- काही करण्याची जिद्द मनात असल्यास कोणतेही ध्येय गाठता येत अस म्हटलं जात. आणि हे पूर्ण करून दाखवलंय नाशिकच्या अबीर मोरे या आठ वर्ष्याच्या बालकाने. या बालकाने किचकट आणि धोकेदायक थोरांग पास सर केला आहे. अबिरचे नाशिकरांकडून कौतुक केल जात आहे.
अबीर हा पोलीस दलातील संदीप यांचा मुलगा. अबिरला लहानपणासून खेळाडू वृत्तीचे बाळकडू मिळाले आहे कारण वडील संदीप हे राष्ट्रीय नेमबाजीतील खेळाडू आहेत. अबीर लहानपणासून वडिलांना बघत आलाय. वडिलांची जिद्द आणि खेळाडूची वृत्ती बघून त्याने सुद्धा काही वेगळ करण्याचा विचार मनात बाळगला होता.
वडिलांना एव्हरेस्ट सर करायचे होते तेव्हा अबीर सुद्धा वडिलांसोबत सह्यांद्रीच्या डोंगरामध्ये जात होता. वडिलांनी एव्हरेस्ट बेसकॅम्प पूर्ण केला होता. त्यानंतर अबीरने सुद्धा हिमालयातील ट्रेक करण्याचा विचार केला. ट्रेक करण्याकरिता अबीरने वडिलांकडे हट्ट धरला. वडील आणि आईने अबीर चा हट्ट पूर्ण करण्याच ठरवील. अबीरन त्यानंतर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास सुरवात केली. अबीर लहान असल्याने डॉक्टरांच्या सल्ला घेऊन त्याची तयारी करण्यात आली.
अनेक संकटांचा सामना
यानंतर संकट होत ते अन्नपूर्ण ट्रेक पर्यंत जाण्याच. त्याच बरोबर नेपाळ सरकारची परवानगी सुद्धा आवश्यक होती. १२ वर्षांखालील लहान मुलांना कोविड टेस्ट आवश्यक असल्यामुळे विमानात प्रवेश मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. अबीरला इतर सदस्यांबरोबर विमानतळावर एक दिवस रहावे लागले. दुसऱ्या दिवशी टेस्ट करून काठमांडूच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
१८ मे रोजी ट्रेकला उत्साहात सुरुवात करण्यात आली. रोज १०-१२ किमी चालत त्यांनी धारापानी येथे नेपाळ सरकारची ट्रेकची परवानगी घेऊन मलांग, याक खाकरा, लेदर असा खडतर प्रवास केला. यानंतर ४८०० मीटर उंचीवर असलेले रांग हाय कॅम्प गाठले. २३ मे रोजी पहाटे ३ वाजता टीमने समीटची चढाई सुरू केली. यावेळी उणे ८ तापमान होते. यासह बर्फवृष्टी, झोंबणारे वारे, कमी होणारा ऑक्सिजन व भूस्खलनाच्या बाजूने जाणाऱ्या निमुळत्या वाटा या सर्व गोष्टींना न घाबरता त्यांनी साडेसहा तासांत सर्वात ५४१६ मीटर उंचीवर असलेला थोरांग पास सर केला आहे. यानंतर लगेच मुक्तिनाथ (३८०० मीटर) या ठिकाणी आले. या संपूर्ण प्रवासात सर्वात लहान अबीर ला बघून सर्वाना आचर्य वाटत होते. अबीर ची जिद्द बघून काहीनि त्याच्या सोबत सेल्फ सुद्धा काढला. त्याच्या शौर्याची दखल नेपाळ प्रशासनाच्या नेपाळ टुरिझम बोर्डने प्रमाणपत्र देत त्याला सन्मानित केले.