सांस्कृतिक पुण्याला धक्का ! ती त्याला शिकवायला येत होती, पण त्याच्या डोक्यात भलतंच होतं

शिक्षण राहिले बाजूला, शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा अल्पवयीन विद्यार्थ्याने बनवला अश्लिल व्हिडिओ

Updated: Apr 1, 2022, 01:29 PM IST
सांस्कृतिक पुण्याला धक्का ! ती त्याला शिकवायला येत होती, पण त्याच्या डोक्यात भलतंच होतं title=

पुणे : Pune Crime News : शिक्षणाच्या माहेर घरात एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा कारनामा पाहून संताप आणि चीड व्यक्त होत आहे. त्याच्या या कारनाम्यामुळे शिक्षक आणि पालकांना धक्का बसला आहे.  घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्याची शिकवणी घ्यायला घरी आलेल्या शिक्षिकेचे व्हिडिओ अल्पयीन विद्यार्थ्याने आपल्या मोबाई मध्ये चित्रित केला. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक आणि किळसवाणी प्रकार घडला आहे.  

ट्यूशन शिक्षकाने विद्यार्थीनीला दाखवला पॉर्न, नकार दिल्याने ...

16 वर्षीय अल्पयीन विद्यार्थ्याने आपल्याच घरातील वॉशरूममध्ये  मोबाईल ठेवून शिक्षिकेचे व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे. शिक्षिकेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी विद्यार्थ्यानेच आपल्य वॉशरूममध्ये मोबाईल फोन लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल आहे.

तसेच शिक्षिका विद्यार्थ्याला घरी शिकवत असताना अल्पयीन विद्यार्थ्याने शिक्षिकेचा छातीचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचं पिडीत शिक्षिकेने आपल्या फिर्यादीत लिहिले आहे.  या प्रकरणात पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून पुण्यातील  अलंकार पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलाला विरोधात विनयभंग आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र या घटनेमुळे शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात खळबळ उडाली आहे.