अरे देवा! बारावीच्या परीक्षा तोंडावर असतानाच नव्या अडचणींची चाहूल? पाहा मोठी बातमी

HSC Board Exams Latest News : बारावीच्या परीक्षांसाठी आता काही दिवस शिल्लक असतानाच समोर आली मोठी बातमी, पाहा कोणाच्या भूमिकेमुळं उदभवलीये ही अडचण...   

सायली पाटील | Updated: Jan 31, 2024, 10:35 AM IST
अरे देवा! बारावीच्या परीक्षा तोंडावर असतानाच नव्या अडचणींची चाहूल? पाहा मोठी बातमी  title=
education news, news, Marathi news, board exams, 12th practical examination, material for 12th practical examination, educational institution operators, बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, शिक्षणसंस्था चालक, बारावी प्रात्यक्षिक परीक्षा

HSC Board Exams Latest News : इयत्ता बारावी अर्थात HSC परीक्षा तोंडावर असतानाच आता विद्यार्यांना पेचात पाडणारी बातमी समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही बातमी अतिशय महत्त्वाची असून, ती थेट विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांशी संबंधित आहे. लवकरच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होणार आहे.  होणारेय. मात्र या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचं वादळ घोंगावतंय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळानं बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे आणि या परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सहकार्य करण्यास नकार दिलाय. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. 

हेसुद्धा वाचा  : Budget 2024 : अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; भारतीय अर्थव्यवस्था आता... 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांकडे बोर्डाकडून लक्ष दिलं जात नसल्यामुळं  महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने अखेर टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्यानुसार शाळा आणि शाळेतील कर्मचारी वर्ग प्रात्यक्षिक परीक्षांसाठी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचं सांगण्यात आलं. आपल्या या कृतींमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असलं तरीही नाईलाज म्हणून हे शेवटचं पाऊल उचललं जात असल्याचं राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने म्हटलं आहे. 

 

काय आहेत शिक्षण संस्थाचालकांच्या मागण्या?

  • राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या जागांवर 2012 पासून अद्याप शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळं ही ताटकळलेली भरती प्रक्रिया ताबडतोब करावी.
  • महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर थकीत अनुदान द्यावे (2004 ते 2013 पर्यंतचे)
  • प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध.
  • नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती द्यावी.

यंदाच्या वर्षी बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 दरम्यान पार पडणार आहे. त्यामागोमागच दहावीची परीक्षा पार पडणार असून, तिचा कालावधी 1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं ही परीक्षा नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागांमध्ये पार पडणार आहे.