वन्समोअरला पर्यायी शब्दच नाही; बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरण

Deepak Kesarkar : बालभारतीच्या पहिलीच्या कवितेवरून नेटकरी संतापलेयत...मराठी कवितेत हिंदी, इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्याने कविता ट्रोल केली जातेय..

वनिता कांबळे | Updated: Jul 23, 2024, 10:23 PM IST
 वन्समोअरला पर्यायी शब्दच नाही; बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरण title=

Balbharati Textbook News :   ठुमकत नाचत आला मोर, वन्समोअर, वन्समोअर झाला शोर! जंगलात ठरली मैफल नावाची ही मराठीच्या पहिलीच्या बूकमधली कविता.. आता पहिलीच्या बूकमध्ये.. तेसुद्धा मराठीच्या पुस्ताकामध्ये असे इंग्रजी शब्द आले म्हटल्यावर.. मग वाद तर होणारच... सोशल मीडियावरही या कवितेची जोरदार चर्चा सुरु आहे... ही कविता पूर्वी भावे यांची आहे.. मात्र कवितेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय.. 

आता ही कविता असेल मराठीची.. मात्र स्टूडंट्सना या कवितेमध्ये मराठीबरोबरच इंग्रजी आणि हिंदी शब्द देखील आहेत. आता हेच बघा.. वन्स मोअर... माऊस... हे इंग्रजी वर्ड्स आहेत.. तर शोर हा हिंदी शब्दही यात वापरण्यात आलाय.. मराठी भाषेच्या पुस्तकात ही कविता समाविष्ट करण्यात आल्याने कोणाला ते पटलेलं नाही.. मात्र बालभारतीने दिलेले स्पष्टीकरण काहीसं विचित्रच अस आहे. 

आता पहिलीच्या बूकमध्ये ही कविता 2017 पासूनच होती असं बालभारतीकडून सांगण्यात आलंय.वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या पोएमची कम्प्लेंट कोणीच केली नव्हती अशी माहिती बालभारतीनेच दिलीय. यावरुनच साहित्यिकांनी बालभारतीवर निशाणा साधलाय..मराठीच्या पुस्तकामधील कवितांची चुकांची दुरुस्ती करा.. समर्थन का करताय असा सवाल आता बालभारतीला विचारला जातोय... तेव्हा बालभारती या चुकीकमधून काही धडा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. 

बालभारतीच्या पहिलीच्या कवितेवरून नेटकरी संतापले

बालभारतीच्या पहिलीच्या कवितेवरून नेटकरी संतापलेयत...मराठी कवितेत हिंदी, इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्याने कविता ट्रोल केली जातेय...बात, माऊस, शोर, वन्स मोअर असे इंग्रजी शब्द कवितेत वापरण्यात आलेयत....'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर' असे शब्द वापरल्याने सोशल मीडियावरून बालभारतीला सवाल विचारण्यात आलेयत...इयत्ता पहिलीच्या पुस्तकात 'जंगलात ठरली मैफल' अशी कविता आहे. या कवितेच्या शेवटच्या ओळीत इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आलाय...जवळपास 5 शब्द हे इंग्रजी वापरण्यात आलेय...त्यामुळे युजर्सनी संताप व्यक्त केलाय...
 

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरण

बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी मात्र अजब स्पष्टीकरण दिलंय.. वन्स मोअरला पर्यायी शब्द नाही.. आपण पुन्हा एकदा पुन्हा एकदा असं म्हणत नाही असं शिक्षणमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच टेबलला टेबलच म्हणतो, कपबशीला कपबशीच म्हणतो असंही शिक्षणमंत्री बोलले आहेत.. तरीही समितीला एकदा विचार करायला सांगतो असं आश्वासनही दीपक केसरकरांनी दिलंय.