मुंबई : गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहाना ग्रुपचे संचालक सुधाकर शेट्टी यांच्या घरी आणि कार्यालयावरील ईडीच्या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्र हाती लागलीयत. डिएचएफल कंपनीचा प्रमोटर कपिल वाधवानच्या चौकशीनंतर सुधाकर शेट्टीचं नाव पुढे आलंय. या कागदपत्रानुसार सुधाकर शेट्टी आणि अनेक नेत्यांमधील व्यवहारांचा खुलासा झालाय.
यामध्ये हरियाणाच्या माजी मंत्री आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांशी आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्ट झालाय. राज्यातील एक महत्वाचा नेता आणि सुधाकर शेट्टी यांचा जुहू परिसरातील एका जमीन व्यवहारही चौकशीच्या फेऱ्यात आहे.
हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या लग्नात शेट्टींनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
शेट्टींनी अनेक नेत्यांना हेलिकॉप्टरची मोफत सेवा दिलीय. नेत्यांशी झालेल्या व्यवहारांबाबत सुधाकर शेट्टींची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे ईडीतर्फे त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे.
या छाप्यात सुधाकर शेट्टीच्या २० बनावट कंपन्यांचाही पर्दाफाश झाला आहे. या बनावट कंपन्याचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचं कळतयं.
आसाममध्ये नदीला आग, तीन दिवसांपासून धगधगतेय
...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं
जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत असं घडू नये