मुंबई - गोवा महामार्गावर डंपर-कार अपघातात ४ ठार

  मुंबई - गोवा महामार्गावर आज संध्याकाळी भरधाव जाणारा डंपर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले.  

Updated: Jan 27, 2018, 10:32 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावर डंपर-कार अपघातात ४ ठार title=

रायगड :  मुंबई - गोवा महामार्गावर आज संध्याकाळी भरधाव जाणारा डंपर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले. वडखळनजीक खारपाले गावाजवळ हा अपघात सायंकाळी सहा  वाजण्याच्या सुमारास झाला.   

कार डंपर खाली चिरडली

ठोकर झाल्यानंतर दोन्हीं वाहने रस्त्याच्याकडेला शेतात फेकली गेली. कार डंपर खाली चिरडली गेल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांची पंचनामा केला. 

या अपघातातील मृतांची नावे उशीरा हाती आलीत. मात्र सर्व मृत हे रायगडच्या रोहा आणि खांब परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

अपघातातील मृतांची नावे

- चंद्रकांत चितळकर

- सिंधू चितळकर 

- अजय चितळकर सर्व राहणार खांब रोहा

 - रविकांत सुर्वे, रा. अंधेरी, मुंबई