Oranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...

Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे. 

Updated: Nov 17, 2022, 09:00 PM IST
Oranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना... title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे. या प्रशांकडे केंद्र सरकारने लक्ष घालून सोडवण्याची मागणी माहाऑरेंजकडून केलीं जात आहे. सततच्या पावसाने संत्र्याचे आंबिया बहारमध्ये यंदा उत्पादन कमी झाल्यानं चांगला भाव मिळेल अशी आशा होती. पण झाल उलट, विदर्भातील संत्र्याला बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. बांगलादेश संत्र्याच्या आयातीवरील आयात शुल्क (Import Duty) सातत्याने ड्युटी (आयात शुल्क) मागील वर्षांपासून वाढवत होते. (Due to lack of market for oranges prices have fallen farmers exporters are in trouble)

पण यंदा आयात शुल्क वाढून किलोमागे 63 रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे नागपूर आणि अमरावती (Nagpur and Amravati) जिल्ह्यातून बांगलादेशला जाणारे संत्रे तिथे महाग विकले जात आहे. परिणामी बांगलादेशात संत्र्याला उठाव होत नसल्याने व्यापाऱ्यांनी विदर्भातून संत्र्याची आवक (आयात) थांबविली आहे. जिथे पूर्वी बांगलादेशला रोज 200 ट्रक संत्रा जात होता. तेच सध्या फक्त 20 ट्रक संत्रा निर्यात केला जात आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान: 

त्यामुळे उर्वरित संत्रा स्थानिक बाजारात विकावा लागत आहे. त्यामुळे अचानक स्थानिक बाजारातही संत्रा आवक वाढल्याने भाव घटले आहे. यात जिथे स्थनिक बाजरात संत्रा हा 28 ते 30 रुपये विकला जाणार होता. तोच संत्रा आता  18 ते 20 रुपये किलोने विकला जात आहे. याचा एका टनामागे 7 हजार ते 12 हजार रुपयांपर्यंत फटका बसत आहे. यात शेतकरी (Farmers) कुटुंबातील राकेश मानकर याने फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून संत्रा निर्यात सुरू करत होते. यंदाही प्रोसेसिंग करून  संत्रा पाठवायला. पण यंदा मोठं नुकसान (Loss) झाल्याचे राकेश मानकर सांगतात. 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

भारत - बांग्लादेश आयात शुल्क? 

चार वर्षांपूर्वी संत्र्यावर बांगलादेशात आयात शुल्क हे 20 रुपये प्रति किलो इतके होते. पण मागील तीन वर्षात सातत्याने आयात शुल्क वाढवून 63 रुपये प्रति किलो वर जाऊन पोहोचले असल्याचे सांगितले जात आहे. तेच बांगलादेशात इतर ठिकाणाहून येणारा संत्रा हा स्वस्त दरात स्थानिक बाजारपेठेत विकला जातो. त्या तुलनेत भारतातुन (India) जाणार संत्रावर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढल्याने संत्र्याची भाव वाढला आहे. यामुळे यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून आयात शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न केल्यास पुन्हा संत्र्याला चांगला भाव मिळेल. याचा फायदा निर्यातदार आणि शेतकरी यांनाही होईल अशी मागणी माहाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ यांनी केली आहे.