मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच वर्षानंतर आरोपीसचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या पुण्याच्या कोर्टात केलं जाणार हजर सीबीआयचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. सीबीआय आणि एटीएसने संयुक्तरित्याही कारवाई केलीय. सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा रहाणारा आहे. २० अॅगस्ट २०१३ ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती . अवैध्य शस्त्रसाठ्या प्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीची देखील दाभोळकरांच्या हत्येत हात असल्याची कबूली चौकशी दरम्यान मिळाली आहे.
हे सगळ कर्नाटक पोलिसांमुळे होतय अस कन्नड माध्यमाच मत आहे..कर्नाटक SIT ने महाराष्ट्र SID ला खुप inputs दिले आहेत अशी माहिती आहे.
२० ऑगस्टला ५ वर्षे पूर्ण होतील. सीबीआयने एवढ्यावर न थांबता खूनाशी संबधित व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई करावी असे हमीद दाभोलकर यांनी म्हटलंय.
गौरी लंकेश हत्येप्रकरणात १२ जणाना अटक करण्यात आली. त्यामधल्या एकाकडे डायरी मिळून आली. त्यातुन बरच काही तपास यंत्रणेच्या हाती लागल आहे.अटक केलेल्या १२ पैकी एकाने कलबुर्गी यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.