मराठा समाज करणार बेमुदत चक्री उपोषण

 मराठा समाज आता चक्री उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणार

Updated: Aug 18, 2018, 09:58 PM IST

पुणे :

रस्त्यावरील आंदोलन स्थगित करण्याच्या निर्णयानंतर मराठा समाज आता चक्री उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात समाजाच्यावतीने  करण्यात आलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी गालबोट लागले. जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र बंदचा मोठा फटका एसटी वाहतुकीला बसला तसेच जनजीवनही विस्कळीत झाले होते. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसळ वळण लागले. जाळपोळ, तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.

आचारसंहिता तयार 

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे येत्या सोमवारपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला कुठलंही गोलबोट लागू नये यासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.