अक्षय मरेचं प्रशिक्षण, आहार सर्व खर्च या कंपनी करणार

पुण्यातील अक्षय मरे या उद्योन्मुख बॉक्सरची कहाणी 'झी 24 तास'वर प्रसारीत झाल्यानंतर त्याला मदतीचा हात मिळू लागलाय.

Updated: Sep 18, 2017, 10:43 PM IST
अक्षय मरेचं प्रशिक्षण, आहार सर्व खर्च या कंपनी करणार title=

पुणे : पुण्यातील अक्षय मरे या उद्योन्मुख बॉक्सरची कहाणी 'झी 24 तास'वर प्रसारीत झाल्यानंतर त्याला मदतीचा हात मिळू लागलाय. डोर्फ केटल केमिकल्स इंडिया या कंपनीने अक्षयसाठी स्पॉन्सरशिप देऊ केलीये. या कंपनीच्या सीएसआर योजनेव्दारे अक्षयला दत्तक घेण्यात आलं असून त्याच्या प्रशिक्षणाचा, आहाराचा सर्व खर्च या कंपनीव्दारे केला जाणार आहे. 

याशिवाय त्याची कामगिरी उंचावण्यासाठी त्याला विशेष आर्थिक सहाय्यदेखील देण्यात येणार आहे. या मदतीचं एक पत्र कंपनीकडून अक्षयला देण्यात आलंय. या मदतीमुळे मिळालेल्या प्रोत्साहनामुळे बॉक्सिंगमध्ये अधिक मेहनत करुन यश संपादन करण्याचा विश्वास अक्षयनं व्यक्त केलाय. याचबरोबर 'झी 24 तास' ने सर्वप्रथम आपली खडतर वाटचाल दाखविल्यामुळेच आपल्याला ही मदत मिळाल्याची भावनाही त्यानं व्यक्त केलीय.