सुमेध व्हावळ, आयर्न मॅन ट्रायथलॉन विजेता

सुमेधनं त्यापेक्षाही कमी वेळात हे सारं पार करत भारतीय खेळाडूही या स्पर्धेत यश मिळवू शकतात हे जगाला दाखवून दिलं. 

Updated: Sep 18, 2017, 10:32 PM IST
सुमेध व्हावळ, आयर्न मॅन ट्रायथलॉन विजेता title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : हा आहे सुमेध व्हावळ, चार किलोमीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणं हे सारं सुमधेनं 13 तास 17 मिनिटांमध्ये पारं करत आर्यन मॅन या किताबाला गवसणी गातली. 

फ्रान्समध्ये आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धेत हे सारं 16 तासात पूर्ण करणं गरजेचं होतं. मात्र सुमेधनं त्यापेक्षाही कमी वेळात हे सारं पार करत भारतीय खेळाडूही या स्पर्धेत यश मिळवू शकतात हे जगाला दाखवून दिलं. 

सुमेधचे वडील शशिकांत आणि आई हेमांगी हे दोघेही डॉक्टर असून धावपटूही आहेत. यामुळे खेळासाठी लहाणपणापासूनच त्याला प्रोत्साहन मिळालं. वैद्यकीय शिक्षणासाठी तो सध्या मुंबईत राहत असून तो अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो. या स्पर्धेसाठी सुमेध दीड वर्षांपासून सराव करत होता. 

या स्पर्धेसाठी भारतातून केवळ सहा स्पर्धक गेले होते. सुमेधला एवढ्या यशावरच थांबायचं नसून त्याला ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक पटकावून द्यायची इच्छा आहे.