पुण्यात भटक्या कुत्र्यांचा पोलिसांवर हल्ला

 या कुत्र्याने एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा चावा घेतलाय.

Updated: May 31, 2018, 10:39 PM IST

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात भटक्या कुत्र्याने थेट पोलिसांवर हल्ला केला. या कुत्र्याने एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा चावा घेतलाय. यानंतर या कुत्र्याला जेरबंद करण्यात आलंय. मागील काही महिन्यांपासून आयुक्त कार्यालयात भटक्या कुत्र्यांनी अड्डा केलाय. ही कुत्री जागोजागी पहूडलेली असतात. खुद्द पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनीही याची गंभीर दखल घेतली होती. त्यावर कारवाईचे आदेश दिले होते. पण कारवाई काहीच झालेली नाही.