प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : नालासोपाऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी जन्मलेल्या बाळावर केलेल्या चुकीच्या उपचारामूळे बाळाचा संपूर्ण हात कापावा लागला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील त्रिवेणी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकारवरून डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे. (doctor mistake and the babys hand had to be amputated a shocking incident in Mumbai)
5 ऑक्टोबरला अंजली वाला या महिलेला प्रसूतीकळा जाणवत असल्याने तिला नालासोपारा स्टेशन परिसरात असलेल्या त्रिवेणी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. यावेळी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. मात्र डॉक्टरांनी एका बाळाला शुगर कमी असल्याचे सांगत त्याच्या हाताला चुकीची आयवी (सुई) टोचली होती. मात्र जी आयवी लहान जन्मलेल्या बाळाला वापरायला हवी होती त्यापेक्षा मोठ्या आकाराची आयवी (सूई) वापरण्यात आल्याने बाळाच्या हाताला इजा झाली होती. ज्यात त्या बाळाचा हात डॉक्टरांना कापावा लागला आहे.
डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे माझ्या बाळाचा हात कापावा लागल्याचा आरोप बाळाच्या आईने केला आहे. या प्रकारबाबत त्रिवेणी रुग्णालयाचे डॉक्टर श्याम पारसकर यांना विचारणा केली असता त्यांनी आमच्या रुग्णालयाकडून बाळावर योग्य उपचार केल्याचे सांगितलं असं अंजली वाला म्हणाल्या.