Miss India | सोलापुरातील डॉक्टर तरुणीची मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्राच्या शिरपेचात सोलापुरातील (Solapur) तरुणीने मानाचा तुरा खोवला आहे.

Updated: Aug 22, 2021, 10:23 PM IST
Miss India | सोलापुरातील डॉक्टर तरुणीची मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड title=

सोलापूर : महाराष्ट्राच्या शिरपेचात सोलापुरातील (Solapur) तरुणीने मानाचा तुरा खोवला आहे. सोलापुरातील तरुणीची मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेसाठी (Miss India pageant) निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी डॉक्टर आहे. मिस इंडियासाठी निवड झालेली या तरुणीचं नाव डॉक्टर इशा अभय वैद्य (Doctor Isha Vaidya) असं आहे. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात 26 मुलींमधून ती निवडली गेली. त्यानंतर जयपूरमध्ये दुसरी चाचणी पार पडली. या चाचणीतही इशाची निवड झाली. (Doctor Isha Vaidya from Solapur selected for Miss India pageant)

यानंतर आता तिसरी चाचणी ही राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. या तिसऱ्या चाचणीसाठी इशा सहभागी झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत इशाची निवड झाली, तर तिला इंटरनॅशनल, मिस मल्टिनॅशनल, मिस एशिया पॅसिफिक या स्पर्धांमध्ये तिला संधी मिळणार आहे. त्यामुळे आता इशाच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.