Thane Illegal School List : ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेने ही यादी जाहीर केली आहे (Thane Illegal School). या शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेवू नका असे अवाहन ठाणे जिल्हा परिषदेने पालकांना केले आहे. या अनाधिकृत शाळांवर कारवाईता बडगा उगारण्यात आला आहे. यानंतर पालकांना देखील ठाणे जिल्हा परिषदेने सतर्क केले आहे.
ठाणे जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर ठाणे जिल्हा परिषद मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात 27 माध्यमिक शाळा अनधिकृत आहेत. यापैकी 10 अनधिकृत शाळा सुरू आहेत. 17 शाळांनी शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केले आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2023 - 2024 करिता या अनधिकृत शाळेत मुलांना प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
मुंबईतल्या अनधिकृत शाळांवर आता फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तेव्हा 210 बेकायदा शाळांमधल्या तब्बल 60 हजार विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय.. या विद्यार्थ्याचं समायोजन नजीकच्या पालिका किंवा मान्यताप्राप्त शाळांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र पालकांनी शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा असं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.