Diwali 2022: Diwali निमित्त लहानपणच्या घरी रमले भाजपचे प्रसाद लाड; पाहा ते भावनिक क्षण...

नुकताच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे

Updated: Oct 24, 2022, 12:27 PM IST
Diwali 2022: Diwali निमित्त लहानपणच्या घरी रमले भाजपचे प्रसाद लाड; पाहा ते भावनिक क्षण... title=

Diwali celebration  2022: आज दिवाळी आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आले आहेत सगळे एकमेकांना शुभेच्छा (diwali wishes) देत आहेत. घराघरात अभयंगस्नान (diwali abhyangsnan) झालं असेल, सर्वानी एकत्र फराळ सुद्धा केला असेल. सगळेजण एकमेकांना शुभेच्छा देतात आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना शुभेच्छा देतात एकमेकांना भेटतात एकत्र वेळ घालवतो. असा हा सणांचा राजा दिवाळी सण सर्वांच्या अतिशय जवळचा आणि आवडीचा सण आहे.

आणखी वाचा: Lakshmipujan diwali 2022: या वस्तूंशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण..आवर्जून वापरा..होईल देवी लक्ष्मीची कृपा

दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण...आजच्या दिवशी घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी घरोघरी नांदो अशी प्रार्थना केली जाते. लक्ष्मी आणि गणरायाची आज पूजा केली जाते (lakshmi ganesh pujan diwali 2022). नवीन कपडे परिधान करुन प्रकाशाचा हा सण साजरा केला जातो. लहान मुलांमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह दिसून येतो.लहानथोरांमध्ये सणानिमित्त खूप उत्साह पाहायला मिळतो आणि त्यामुळे सर्वजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात.

आणखी वाचा:  Diwali 2022: नरक चतुर्दशीला करा हे काम घरात होईल भरभराट.. होतील सर्व इच्छा पूर्ण

कलाकार मंडळीसुद्धा आपल्या घरी दिवाळी पार्टीच आयोजन करतात आणि त्यासाठी अनेक कलाकार हजेरी लावतात,सर्व जण अतिशय नटून थाटून पारंपरिक  पोशाखात दिसतात. (celebrity diwali celebration)
कलाकाराचं काय अगदी राजकारणी मंडळीसुद्धा दिवाळीचा सॅन सर्व हेवेदावे बाजूला सारून साजरा करतात. 

नुकताच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ज्यात ते आपल्या नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत या पोस्टला त्यांनी दिलेलं कॅप्शन अतिशय छान आहे . त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय

'' खरा आनंद आपल्या आप्तेष्टांच्या सोबत दिवस घालवण्यात असतो.जीवनातील काही जुने क्षण खूप आनंददायी असतात आणि आठवणी ताज्या करतात.दिवाळीच्या निमित्ताने माझ्या लहानपणीच्या घरी जाऊन काका काकींची भेट घेतली.''

सध्या प्रसाद लाड यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होतेय.