देवस्थान वाद : टेरव ग्रामस्थांचे आंदोलन सुरुच, चर्चा निष्फळ

चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आमरण उपोषण सुरू केले. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टेरव देवस्थानावरून वाद सुरू आहेत. दरम्यान, उपोषणकर्त्यांबरोबर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र तोडगा अद्याप निघालेला नाही.

Updated: Sep 14, 2017, 04:45 PM IST
देवस्थान वाद : टेरव ग्रामस्थांचे आंदोलन सुरुच, चर्चा निष्फळ title=

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आमरण उपोषण सुरू केले. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टेरव देवस्थानावरून वाद सुरू आहेत. दरम्यान, उपोषणकर्त्यांबरोबर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र तोडगा अद्याप निघालेला नाही.

श्री भवानी वाघजाई जीर्णोद्धार ट्रस्ट विरुद्ध ७० टक्केहून अधिक गावकरी, असा वाद देवस्थानवरून सुरु आहे. त्यातल्या एका गटाने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. किशोर कदम गावातील ग्रामस्थाना चुकीची माहिती देऊन गावात वाद निर्माण करत असल्याचा आरोप या सोमवारच्या मोर्चेऱ्यांनी केला होता.

त्यानंतर या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. २०११ पासून देवस्थान वादासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच 'श्री भवानी वाघजाई जीर्णोद्धार ट्रस्ट वरळी E/ 19870' यांचे काम २०११ सालीच संपले असून हि जीर्णोद्धार समिती भाविकांची फसवणूक करत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे.

तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे. तसेच सध्या नवरात्रोत्सव जवळ आला आहे. या उत्सवात कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.