पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर असमाधानी - पालकमंत्री गिरीश बापट

पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर समाधानी नाही अशी प्रतिक्रिया देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेला घरचा आहेर दिला आहे. पुणे स्मार्ट सीटीच्या विविध प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, यातील कुठलीच कामं सुरु झाली नाहीत.

Updated: Jun 20, 2017, 08:49 AM IST
पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर असमाधानी - पालकमंत्री गिरीश बापट  title=

पुणे : पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर समाधानी नाही अशी प्रतिक्रिया देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेला घरचा आहेर दिला आहे. पुणे स्मार्ट सीटीच्या विविध प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, यातील कुठलीच कामं सुरु झाली नाहीत.

तसंच स्मार्ट सीटी योजनेसाठी आलेल्या चारशे कोटींच्या निधीपैकी फक्त दहा टक्के निधी खर्च झाला आहे. तसंच PMRDA चा विकास आराखडा एक वर्षाच्या आत बनवणार असल्याची माहितीही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

व्हिडिओ