Sunil Mehta Passed Away | मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहतांचं निधन

 सुनील मेहता यांच्या निधनामुळे (Sunil Mehta Passed Away) विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.   

Updated: Jan 12, 2022, 10:20 PM IST
Sunil Mehta Passed Away |  मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहतांचं निधन title=

पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता (Sunil Mehta Passed Away) यांचं आज पुण्यात उपचारादरम्यान निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. उद्या सकाळी (13 जानेवारी) 9.30ते 10.30 या कालावधीत त्याचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मेहता पब्लिशिंग हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे. सुनील मेहता यांच्या निधनामुळे विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. (director of mehta publishing company and former executor of publishers association sunil mehta passed away at age of 56) 

सुनील मेहता यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनवर 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. सुनील मेहता यांच्या गेल्याने मराठी ग्रंथव्यवहाराचं मोठं नुकसान झालं आहे. सुनील मेहता यांनी प्रकाशन व्यवसायाद्वारे अनेक विषयांवरील उत्तोमोत्त्म पुस्तकांची निर्मिती केली. 

वडिलांकडून व्यवसायाची सूत्र 

सुनील मेहता यांनी 1986 मध्ये आपले वडिल अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सर्व जबाबदारी घेतली. यानंतर त्यांनी कमी वयात आपल्या प्रकाशन  व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या.