धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान

Bollywood Life | Updated: Jan 10, 2020, 05:18 PM IST
धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद title=

धुळे : धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमान नोंदवले गेले आहे. जिल्ह्यात आज सकाळी तापमानाचा पारा 5.2 अंश सेल्सिअस नोंदवला गेला आहे. यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान ठरलं आहे. बोचऱ्या थंडी सोबत गार वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिकच वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा सतत खाली येत असल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बोचर्‍या थंडीचा सर्वाधिक फटका हा सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बसत आहे. 

सकाळी आठ वाजेआधी तर सायंकाळी 6 वाजेनंतर घराबाहेर पडणे कठीण झालं आहे. सायंकाळी थंडीची तीव्रता अधिकच वाढत असल्याने रात्री रस्त्यांवरची रहदारी तुरळक झाली आहे. सकाळच्या शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी मागणी काही पालकांकडून केली जात आहे.