रत्नागिरी : सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि चिपळूणची जीवनवाहीनी समजल्या जाणा-याया वाशिष्ठी नदीचे उगमस्थान असलेल्या तिवरे गंगेची वाडीतील कुंडात तीन वर्षानी कार्तिक प्रतिप्रतिपदेला गंगा प्रकटली.
राजापूर पाठोपाठ सुमारे पाचशे वर्षाची परंपरा असलेल्या या गंगेची ख्याती सर्वदूर असल्यानं असंख्य भाविकांची पावले सध्या गंगा स्नानासाठी तिवरेकडे वळली आहेत. राजापूरची गंगा सर्वत्र प्रसिध्द आहे. मात्र त्या मानां तिवरेमधील गंगा तितकीशी प्रसिद्धीला आलेली नाही.
सुमारे पाचशे वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा या गंगेला आहे. वाशिष्ठी नदीच्या उगमस्थानाजवळच एक पाण्याचा डोह आहे. तेथूनच जवळच गंगेचे छोटसं मंदीर ग्रामस्थानी उभारलंय. या कुंडामध्ये दर तीन वर्षानी दिवाळीत प्रतिप्रदेला गंगा प्रकट होऊन ती अमावस्येपर्यत असते.