Sachin Vaze : अटक आणि कोठडी....देवेंद्र फडणवीस म्हणतात, हा तर एक भाग....

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. NIA ने केलेली मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे.

Updated: Mar 14, 2021, 06:50 PM IST
Sachin Vaze : अटक आणि कोठडी....देवेंद्र फडणवीस म्हणतात, हा तर एक भाग.... title=

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. NIA ने केलेली मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. अंबानींच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडलेली, ती कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मात्र अचानक त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळलं.

हिरेन यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांची कार अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं ठेवण्यात आल्याच्या एक आठवड्याआधीच चोरीला गेलेली.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीनेही दावा केलेला की नोव्हेंबर महिन्यात हिरेन यांनी वाझे यांना SUV दिलेली होती, जी वाझे यांनी फेब्रुवारी महिन्यात परत केली.

मात्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसकडे झालेल्या चौकशीत आपण एसयूव्ही वापरली नसल्याचं वाझे म्हणाले होते.

शुक्रवारी सकाळीच वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. शिवाय चौकशीसाठी वाझे सहकार्य करत असल्यानं त्यांना अटकेपासून संरक्षण मिळावं अशी विनंतीही वाझेंच्या वकिलांनी केलेली. मात्र न्यायालयाने हे अर्ज फेटाळले.

शनिवारी चौकशीअंती रात्री उशिरा सचिन वाझे यांना एनआयएच्या पथकाने अटक केली. आणि न्यायालयासमोर त्यांना हजर केलेलं असता २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान वाझेंना कोठडी सुनावल्यानंतर ही तर सुरूवात आहे, हा तर एकच भाग समोर आलाय. दुसरा यायचा आहे, असं सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. 

  .