Devendra Fadnavis : आता महाराष्ट्राच्या जनतेनेही सांगितलं की हेच कायदेशीर सरकार : देवेंद्र फडणवीस

Fadnvis on Grampanchyat Result : शिंदे सरकारने ग्रामपंचायतीत आघाडी घेतलीय. तर दुसऱ्या बाजूला मविआलाही मतदारांनी पसंती दिलीय. निकालानंतर विधानभवन परिसरात आनंदोत्सव पाहायला मिळाला.

Updated: Dec 20, 2022, 05:43 PM IST
Devendra Fadnavis : आता महाराष्ट्राच्या जनतेनेही सांगितलं की हेच कायदेशीर सरकार : देवेंद्र फडणवीस title=

नागपूर : राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल (Maharashtra Grampanchayat Election Result 2022) जाहीर झाले आहेत. काही ठिकाणी मनसेने खातं उघडलंय. तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-भाजप गटाला जनतेने भरभरुन आपला कौल दिलाय. शिंदे सरकारने ग्रामपंचायतीत आघाडी घेतलीय. तर दुसऱ्या बाजूला मविआलाही मतदारांनी पसंती दिलीय. निकालानंतर विधानभवन परिसरात आनंदोत्सव पाहायला मिळाला. शिंदे-फडणवीस गटाला यश मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. तसेच मविआवर (Mva) जोरदार हल्लाबोल चढवला. सध्या नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. (devendra fadnavis on maharashtra grampanchayat election result 2022 assembly winter session at nagpur maharashtra politics mva bjp)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

"ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे.  आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही अभिनंदन. बावनकुळे यांनी अविरत प्रयत्न करत भाजपच्या उमेदवाराना विजयासाठी अनुकूल वातावरण तयार केलं. त्यामुळे जे लोकं आमच्या सरकारला नावं ठेवत होते, त्यांना न्यायलयानेही सांगितलं होतं की हे सरकार कायदेशीर आहे, आता महाराष्ट्राच्या जनतेनेही सांगितलं की हेच कायदेशीर सरकार आहे. हीच जनता या सरकारच्या पाठीशी आहे" असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आणि मविआवर टीका केली. राज्यात आज 20 डिसेंबरला एकूण 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ताज्या आकडेवारीनुसार भाजप-शिंदे गटाने 2 हजार 500 अधिक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवलाय. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यंत्री शिंदे साहेबांचं, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं सरकार हे अशाच प्रकारे ग्रामीण भागातील जनतेच्या पाठीशी उभं राहिल आणि त्यांच्या आशाआकांशा पूर्ण करेल", अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.