Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत

Sanjay Raut  : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.  

Updated: Feb 14, 2023, 11:32 AM IST
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत title=
Sanjay Raut on Devendra Fadnavis

Sanjay Raut on Devendra Fadnavis : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे. (Maharashtra Political News ) शरद पवार यांच्याशी बोलून जर हा शपथविधी झालं असत तर ते सरकार चाललं असत. ते पडलं नसतं. फडणवीस हे जगातील 10 आश्चर्य आहे, असा टोला राऊत यांनी हाणला आहे. 

त्याचवेळी राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला.  दोन आश्चर्य हे दिल्लीत बसले आहेत. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देणं हे मान्य केलं होतं. हॉटेल ब्लुसीमधील त्यांनी आपलं वक्तव्य तपासून पाहावे. सूरत आणि गुवाहाटीमध्ये फिरुन 40 आमदारांच्या जोरावर झालेलं हे नवीन सरकार शरद पवार यांच्यामुळे झालं आहे असं देखील ते म्हणतील. अनेक ठिकाणी आत्ता त्यांचा पराभव झाला आहे . फडणवीस हे पहाटेच्या शपथविधी मधून ते बाहेर आले नाहीत, असा टोला राऊत यांनी लगावला. 

'भाजपने अनेक लोकांना तुरुंगात टाकले'

भाजपने अनेक लोकांना तुरुंगात टाकलं आहे. तुरुंगात टाकणं हे आमची विकृती नाही . आमचे फोन त्यांनी टॅप करुन ऐकले आहेत. ज्या अधिकाऱ्यांवर फोन टॅपिंग चौकशी सुरु होती ती चौकशी तुम्ही थांबवली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार परत आले आहे. काही काळाने जर मला तुरुंगात जायची वेळ आली तर माझ्या आजूबाजूला सहानुभूतीची लाट निर्माण व्हावी असं त्यांचं स्वप्न होतं, असे ते म्हणाले.

काल त्यांनी कुठलाही गाव गौप्यस्फोट केला नाही, साधी लवंगी फटाके देखील फोडली नाही. हा महाराष्ट्राचा गंभीर विषय नाही. तुम्ही आमचा विश्वासघात का केला, त्याचं तुमच्याकडे उत्तर आहे का? टेस्ट ट्यूब बेबी घेऊन तुम्ही मांडीवर बसला आहात. ब्ल्यू सीमधले वक्तव्य तुम्ही जे अमित शाह यांच्या साक्षीने केलेत ते पुन्हा एकदा तपासून पहा, असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिला.

मुंबई , ठाणे, नाशिक जिथे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तिथे शिवसैनिक माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांना खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही निवडणूक किंवा ईव्हीएम मशीन नाही. आमची शिवसेना ही खरी आहे. आम्ही म्हणजेच शिवसेना आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता आमच्या खिशात आहे, अशा प्रकारच्या गमजा कोणी मारत असेल तर ते देशाचे अपमान करत आहेत, असे राऊत म्हणाले.

मोदी यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नावर पळ काढला - राऊत

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी कोणाच्याही विरोधात भाषण केलं नव्हते. त्यांनी या देशांमधल्या घडामोडींवर काही प्रश्न विचारले. एलआयसी आणि स्टेट बँकचे पैसे कोणाच्या सांगण्यावरुन अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतविले गेले, हा प्रश्न विचारला. हा काही गुन्हा आहे का? सगळे ठेके एकाच माणसाला कसे मिळतात हा प्रश्न विचारला, काही गुन्हा आहे का? यावर उत्तर देण्याची संधी मोदींना मिळाली होती त्यांनी उत्तर न देता पळ का काढला, असे संजय राऊत म्हणाले.