जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवला

Updated: Oct 1, 2018, 02:03 PM IST
जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी title=

जळगाव : जळगाव जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता भुसावळमध्ये बहुजन महासंघातर्फे सरकारी ताफा अडवून आंदोलन करण्यात आलं.

काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी 

कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या गाडीसमोर झोपून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचाही गोंधळ उडाला. बाजारपेठ पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

भारिपतर्फे आंदोलन 

जिल्ह्यात विविध कामे प्रलंबित असल्याने त्याविरोधात भारिपतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याला न्याय देत नसल्याने त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली.