Deepali Sayyad: आधी मुख्यमंत्र्यांची भेट, आता कमळाची रांगोळी... राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या!

Deepali Sayyad rangoli : दिवाळीच्या मुहूर्तावर दिपाली सय्यद यांचे नवे संकेत?, आधी मुख्यमंत्र्यांची भेट आता...

Updated: Oct 26, 2022, 11:43 PM IST
Deepali Sayyad: आधी मुख्यमंत्र्यांची भेट, आता कमळाची रांगोळी... राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या! title=

Deepali Sayyad : ठाकरे गटाचा 'सेलिब्रिटी चेहरा' म्हणून 'दिपाली सय्यद' यांची ओळख आहे. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील चित्र बदललं आणि शिवसेना (Shiv Sena) दुभागली गेली. त्यानंतर दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना समर्थन दिलं होतं. मात्र, आता दिपाली सय्यद यांनी आपला मोर्चा शिंदे गटाकडे वळाल्याची चर्चा आहे. त्या सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता दिपाली सय्यद (Deepali Sayyad Diwali) यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर नवे संकेत दिले आहेत.

दिपाली सय्यद यांनी दिवाळीच्या निमित्ताने काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. आपल्या कुटुंबासमवेत फोटो त्यांनी शेअर केले. घराबाहेर एक छान रांगोळी देखील काढली. मात्र ही रांगोळी काही खास होती. दिपाली सय्यद (Deepali Sayyad rangoli) यांनी कमळाची रांगोळी काढली होती. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मागील काही दिवसांपासून सय्यद यांच्या राजकीय भूमिकेमुळे हा फोटो चर्चेत आला आहे.

आणखी वाचा - ...जेव्हा शरद पवार स्वत: उभं राहून तालुकाध्यक्षाला खुर्चीवर बसवतात!

सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर दिपाली सय्यद ह्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद यांनी सुचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये जाणार?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

पाहा पोस्ट -

मागील काही दिवसांपासून माझा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही, असं सय्यद म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्या शिंदे गटात सामील होणार की काय?, अशी चर्चा सुरू होती. आता त्यांच्या रांगोळीमुळे पुन्हा एकदा शिंदे गट की भाजप ?, असा नवा सवाल उपस्थित होतोय.