'गिरीश बापट भाजपचे खासदार नाहीत तर...'- अजित पवार

अजित पवारांची गिरीश बापटांना कोपरखळी 

Updated: Jan 27, 2021, 02:51 PM IST
'गिरीश बापट भाजपचे खासदार नाहीत तर...'- अजित पवार  title=

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) पुण्यात एकत्र मंचावर होते. संवाद पुणे आयोजित ‘प्रबोधन’चा शतकोत्सव या कार्यक्रमाच्या समारोपात बोलत होते. यावेळी अजित पवारांनी गिरीश बापटांना कोपरखळी लगावली आहे. 'गिरीश बापट हे एका पक्षाचे खासदार नाहीत..' असं म्हणतं  अजित पवारांनी गिरीश बापटांना अनेक कोपरखळ्या लगावल्या आहेत. 

गिरीश बापट यांचा विचार काँग्रेससारखा आहे. त्यामुळेच त्यांचे सर्व पक्षांत संबंध असल्यानंच ते आमदार, खासदार म्हणून निवडून येतात. अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावली आहे. पुढे पवार म्हणाले की, 'निलम गोऱ्हे यांनी गिरीश बापटांचा उल्लेख हा भाजपचे खासदार असा केला. पण बापट एका पक्षाचे नाहीत तर ते पुण्याचे खासदार आहेत. गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेस सारखा आहे.'

अजित पवार म्हणाले, “आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते. ते ताजी-ताजी गोष्ट लक्षात ठेवतात, मात्र नंतर त्याचे परिणाम दिसतात. प्रबोधनकार यांनी ठाकरे शैली निर्माण केली. निर्भीड, परखडपणे बोलण्यासाठी ठाकरे शैली समोर आली. गिरीश बापट यांचा विचार काँग्रेस सारखा आहे. गिरीश बापट भाजपचे खासदार नाही, तर पुणेकरांचे खासदार आहेत. सर्व पक्षात त्यांचे संबंध म्हणून ते आमदार, खासदार म्हणून निवडणूक येतात.”