पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मभूमीवर?

ग्रामविकासमंत्री पंकाज मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वंजारी समाजाच दसरा मेळवा कोठे होणार याबाबत अद्यापही वाद सुरूच आहे. भगवान गडावर दसरा मेळाव्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर हा मेळावा आता भगवान बाबांच्या जन्मभूमीवर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 28, 2017, 11:05 PM IST
पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मभूमीवर? title=

बीड : ग्रामविकासमंत्री पंकाज मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वंजारी समाजाच दसरा मेळवा कोठे होणार याबाबत अद्यापही वाद सुरूच आहे. भगवान गडावर दसरा मेळाव्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर हा मेळावा आता भगवान बाबांच्या जन्मभूमीवर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालूक्यात येणारे सावरगाव ही संत भगवान बाबा यांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी सावरगावातील सप्ताहासाठी गेल्यावर्षी हजेरी लावली होती. या गावातही पंकाजा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यात अडचणी आल्या तर, सावरगावातील मंडळी पंकजाताईंना मेळाव्यासाठी आग्रह करत आहेत.

दरम्यान, भाजपचे दिवंगत नेते आणि पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे हायात असताना भगवान गडावर दसरा मेळावा होत असे. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गडावर कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम घेण्यात येऊ नये अशी भूमिका गडाचे विश्वस्त नामदेव शास्त्री यांनी घेतली आहे. त्यावरूनच पंकजा मुंडे समर्थक आणि भगवानगड असा संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष आजही कायम आहे.