मुंबई : योगगुरू रामदेव बाबा जेव्हा व्यासपिठावर असतात तेव्हा आपल्या कलाकारीने सर्वांचे लक्ष ते सहज वेधून घेतात. पण यावेळेस असा काही प्रसंग घडला की रामदेव बाबा क्षणभरासाठी विचारात पडले. हा प्रसंग मुंबईत घडला. जेव्हा धर्मगुरू दलाई लामा आणि योगगुरू रामदेव बाबा एकाच व्यासपिठावर होते. त्यावेळी दलाई लामा यांनी रामदेव बाबांना स्वत: कडे बोलावून घेतले आणि ते जवळ आल्यावर त्यांची दाढी खेचली.
मुंबईतील ‘वर्ल्ड पीस अँड हार्मोनी’ या कार्यक्रमात जगभरातील दिग्गज व्यक्ती शांततेचा संदेश देण्यासाठी एकाच व्यासपीठावर आले होते. रामदेव बाबा, दलाई लामा यांच्यासह जगभरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या या कार्यक्रमात होती. प्रत्येकाने आपली शांततेविषयीची मते यावेळी मांडली. या कार्यक्रमात योगगुरू रामदेवबाबा भाषण करत होते तेव्हा त्यांनी दलाई लामांवर स्तुतीसुमनं उधळली, चीनचा विश्वास युद्धापेक्षा शांततेवर जास्त आहे तसंच नसतं तर दलाई लामा आज या कार्यक्रमात आलेच नसते असं वक्तव्य रामदेवबाबांनी केलं. तसेच स्टेजवर योगासनं करून सगळ्यांची मनं जिंकली.
या कार्यक्रमात जेव्हा दलाई लामा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी योगगुरू रामदेवबाबांना आपल्या जवळ बोलावले. यावेळेस मजेशिर प्रसंगाला सुरुवात झाली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं ही दृश्यं कॅमेरात कैद करत तो प्रसंग ट्विटही केला आहे. दलाई लामा यांनी बोलावल्यावर रामदेव बाबा त्यांच्यासमोर भेटण्याच्या उद्देशाने पुढे आले. यावेळी दलाई लामा यांनी रामदेव बाबांची भेट तर घेतलीच पण मिश्किलपणे त्यांची पकडून खेचली आणि त्यांच्यासोबत काहीशी मस्करीही केली. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
#WATCH: Dalai Lama and Baba Ramdev share a light moment at World Peace & Harmony Conclave in Mumbai pic.twitter.com/JACFezv56B
— ANI (@ANI) August 13, 2017
बाबरी प्रकरणी शिया धर्मगुरू कस्बे सादिक यांनीही आपले विचार यावेळी मांडले. बाबरी प्रकरणी हिंदू बांधवांच्या बाजूनं निर्णय आला तर मुस्लिमांनी तो निर्णय स्वीकाराला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं, तर मुस्लिमांच्या बाजूनं निर्णय आला तर त्यांनी वादग्रस्त जमीन हिंदूंना द्यावी असेही ते म्हणाले.