Holi | पाण्याच्या फुग्यामुळे एकाचा मृत्यू, होळीचा उत्साह एकाच्या जीवावर बेतला

होळीचा उत्साह एकाच्या जीवावर बेतला आहे.  

Updated: Mar 17, 2022, 10:38 PM IST
Holi | पाण्याच्या फुग्यामुळे एकाचा मृत्यू, होळीचा उत्साह एकाच्या जीवावर बेतला       title=
प्रातिनिधिक छायाचित्र

प्रथमेश तावडे,झी मीडिया,विरार : विरार (Virar) मध्ये होळीचा उत्साह (holi celebration) एकाच्या जीवावर बेतला आहे. विरार पश्चिमेच्या पुरापाडा चाळपेठ नाक्यावर पाण्याचा फुगा फेकल्याने झालेल्या अपघातात एका सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रामचंद्र हरिनाथ पटेल (५०) असं त्याचे नाव आहे. (cyclist dies in virar due to water bubble during holi celebration)

विरार पश्चिमेच्या पुरा पाडा रस्त्यावर पाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रामचंद्र हे आपल्या सायकल वरून पुरापाडा येथून विरार दिशेने जात होते.

याच दरम्यान होळी घेऊन जाणारा एक ट्रक या रस्त्यावरून जात होता. या ट्रक मधील काही तरुणांनी पाण्याने भरलेले फुगे एका भर वेगात येणाऱ्या बाईक स्वाराला मारला. या फुग्याने काही क्षणातच बाईक स्वाराचे नियंत्रण सुटले व त्याची धडक सायकलवरून चाललेल्या रामचंद यांना बसली.

बाईकची ही धडक इतकी भीषण होती की त्यात सायकलवर स्वार असलेल्या रामचंद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती नागरिकांमार्फत अर्नाळा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच सोबत पोलिसांनी बाईक स्वारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दुचाकीस्वार तरुण हे अर्नाळा किल्लात राहणारे आहेत.

होळी, धुळवडीत फुगे मारण्यावर बंदी असतानाही काही उत्साही मंडळी रस्त्यावररून जाणाऱ्यांना फुगे मारून आपला आनंद साजरा करताना दिसत आहेत. मात्र याचं आनंदात अनेकांना दुर्घटनेचे बळी व्हावे लागते हे सत्य ही लपणारे नाही.