पुण्यात 30 रुपयांच्या नादात 2 लाख गमावले, पाहा व्हिडीओ

 2 लाख असतानाही 30 रुपयांसाठी फसला...पाहा कसं हातोहात गंडवलं, हे तुमच्यासोबतही घडू शकतं  

Updated: Sep 17, 2021, 06:27 PM IST
पुण्यात 30 रुपयांच्या नादात 2 लाख गमावले, पाहा व्हिडीओ title=

जावेद मुलाणी, झी मीडिया पुणे: कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये फसवणुकीचे अनेक फंडे वाढले आहेत. ऑनलाइनच आणि ऑफलाइन फसवणुकीच्या प्रमाणांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी पावला पावलावर सावध राहाणं गरजेचं आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातल्या इंदापूर शहरात तीन अनोळखी इसमांनी एका दुचाकीस्वाराला 2 लाख 33 हजारांचा गंडा घातला. 

चोरी करण्यासाठी चोर अनेक क्लुप्त्या शोधून काढतात. बँकेबाहेर, दुकानाबाहेर सावज हेरुन पैसे लंपास करणारे ठग तुम्ही पाहिले असतील. इंदापूरात विकास भोसले यांना अगदी दिवसाढवळ्या भर रस्त्यात हातोहात गंडवलं आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रस्त्यावर 10 रूपयांच्या तीन नोटा टाकल्या. 

भोसले यांना पैसे रस्त्यावर पडल्याचं सांगितलं. हाच मोह भोसलेंना महाग पडला. भोसलेंनी पैसे उचलण्यासाठी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. ते पैसे उचलायला लागताच चोरट्यांनी हँन्डलला अडकवलेली पैशांची पिशवी घेऊन धूम ठोकली.

भोसले यांना 30 रुपयांचा मोह चांगलाच महागात पडला. त्यांच्याजवळची 2 लाख रुपयांची बॅग चोरांनी लंपास केली. त्यामुळे मोह आवरणं गरजेचं आहे. चोरीच्या वेगवेगळ्या क्लुप्या लफंगे शोधत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कायम सतर्क राहायला हवं.

काय काळजी घ्यावी, पोलिसांकडून आवाहन

तुमच्यासोबतही असं काही झालं तर सर्वात आधी गोंधळून जाऊ नका. आपल्याकडे खरोखर अशा नोटा होत्या का, हे आठवून बघा. आपले खिसे तपासून आपल्या नोटा खरंच पडल्या आहेत का, हे पाहा. तुमच्या नोटा नसतील, तर सरळ तिथून काढता पाय घ्या. भलत्या मोहात पडून आपलं नुकसान करून घेऊ नका. आता पोलिसांसमोर अशा भूरट्यांना रोखण्याचं आणि शोधण्याचं आवाहन आहे.