Crime News : नाशकात (Nashik Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा (Nashik Police) वचक राहिला आहे की नाही असा सवाल आता केला जात आहे. अशातच नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावासायिक हेमंत पारख (Hemant Parakh) यांचे अपहरण (kidnapp) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे हेमंत पाररख यांचे त्यांच्या राहत्या घराच्या बाहेरुनच अपहरण करण्यात आल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. पारख यांचा रात्रभर पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र हेमंत पारख यांचे अपहरण का केले? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच याप्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
नाशिकमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी हेमंत पारख यांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
हेमंत पारख यांचे अपहरण झाल्याची कळताच कुटुंबियांना धक्का बसला आहे. शनिवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी अज्ञात इसम पारख यांच्या घरासमोर आले. हे गुंड चारचाकी आणि दुचाकीवरून आले होते. त्यानंतर त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत कोंबले पसार झाले. घरासमोरुनच पारेख यांचे अपहरण झाल्याने नाशिककर हादरून गेले आहेत. दरम्यान, पारख यांचा अजूनही शोध लागलेला नाही. पोलिसांनी अनेकांची साक्ष सीसीटीव्हीही तपासण्याचे काम सुरु केले आहे. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.