पुणे : Covid-19: 7 People Infected Corona new variant In Pune :कोरोनाची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये कोरोनाचे व्हेरियंट आढळले आहेत. एकूण सात जणांना या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. ( 7 People Infected In Pune infected with new variant of Corona) रुग्णांमध्ये एका 9 वर्षीय मुलाचा देखील त्यात समावेश असल्याची माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. मात्र असे जरी असले तरी या नव्या व्हेरियंटचा शरीरावर फार घातक परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात काल प्रथमच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट बी.ए. 4 चे चार आणि बी.ए.5 यांचे तीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाकडून शनिवारी ही माहिती देण्यात आली. दरम्यान यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत अजून भर पडली आहे. आता पुण्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळ्याने चिंता वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेसह जगाच्या काही भागांमध्ये एप्रिलमध्ये ओमायक्रॉनचे सब-व्हेरिएंट आढळले होते, परंतु महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. गेल्या आठवड्यात तामिळनाडू आणि तेलंगणामध्येही याचे रुग्ण आढळून आले आहेत. आता महाराष्ट्रातही रुग्ण आढल्याने धास्ती वाढली आहे.
राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, BA4 आणि BA5 हे ओमिक्रॉनचे सब-व्हेरिएंट आहेत, जे सौम्य मानले जातात. या सब-व्हेरिएंटबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले. हे सब-व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य आहेत असून गेल्या काही आठवड्यांत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.