मुंबई : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांना आतापर्यंत ४२ चिमुकल्यांना कोरोनामुक्त केले आहे. त्यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन । उपचारादरम्यान वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी जिल्हा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला #CoronaVirus #CoronaVirusUpdates#COVID19 @ashish_jadhao pic.twitter.com/hKB101czHN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2020
डॉ. दिलीप मोरे यांनी आपल्या ४० व्या वर्षी वेगळा असा ठसा रत्नागिरी जिल्ह्यात उमटवला होता. डॉक्टर मोरे यांनी आपली सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्यांना कोरोना झाला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
#ratnagiri #WarAgainstVirus
जिल्ह्यात 24 तासात 20 नवे पॉझिटिव्ह एकूण संख्या 2012
1357 बरे झाले : प्रमाण 67.4 टक्के @MahaDGIPR @InfoDivKonkan @DMRatnagiri @advanilparab @samant_uday @MiLOKMAT @RatnagiriPolice @meanagha @AirRatnagiri @rajeshtope11 @maaykokan @RatnagiriPolice pic.twitter.com/j3n1StWHDP— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) August 5, 2020
रत्नागिरीत जिल्ह्यात २४ तासात २० नवे कोरोना बाधित रुग्ण सापडलेत. बाधित रुग्ण- (२०१२), बरे झालेले रुग्ण- (१३५७), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८६)