आ.बच्चू कडूंनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला- नगरसेवक तिरमारे

आमदार बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ७ फेब्रुवारीला चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी दाखल केली 

Updated: Feb 10, 2018, 09:32 PM IST
आ.बच्चू कडूंनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला- नगरसेवक तिरमारे  title=

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ७ फेब्रुवारीला चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी दाखल केली होती.

लेखी तक्रार 

बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयक माहिती लपवण्याची लेखी तक्रार केली होती. तर काही महिन्यांपूर्वी गोपालपुर मारे विरोधात अमरावती शहरातील एका महिलेनं बलात्काराची तक्रार केली होती. 

जीवे मारण्याचा प्रयत्न 

 गोपाल तिरमारे यांना जमीन मिळालाय. तीन दिवसांपूर्वी बच्चू कडूंचं समर्थक आपल्या घरी येऊन धमकावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार गोपाल तिरमारे यांनी केली होती. ही तक्रार पोलिसांनी चौकशीत ठेवली होती. 

राजकीय वैमनस्य 

गोपाल तिरमारे हे भाजपचे नगरसेवक असल्यानं वरिष्ठ पातळीवरून पोलिसांवर दबाव आणून गुन्हे दाखल केल्याचा आरोप बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी केलाय. एकूणच हे प्रकरण राजकीय वैमनस्यातून घडल्याचं चित्र दिसतंय.