Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना

Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

Updated: Mar 29, 2023, 08:11 AM IST
Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना  title=
संग्रहित छाया

Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागणी झाली आहे.

शंभूराज देसाई यांनी स्वत: सोशल मीडियावरुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सध्या आयसोलेशनमध्ये असून घरीच डॉक्टर्सकडून उपचार घेत असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे..मात्र भुजबळ आणि शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं इतर आमदारांचे टेन्शन वाढले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात भुजबळ आणि देसाईसुद्धा अनेक आमदारांच्या संपर्कात आले होते. 

'अडीच वर्ष राज्यमंत्री पण...' शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट

भुजबळ यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली. त्यांनी ट्विटवरुन आवाहन करताना म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी.  

महाराष्ट्रातील कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट वाढल्याने चिंता

3 मार्च रोजी महाराष्ट्रातील कोरोनाव्हायरस व्हेरिएंटचा पॉझिटिव्ह रेट 0.54 टक्के होता, जो 23 मार्च रोजी वाढून 4.58 टक्के झाला. दिल्लीत, कोरोनाव्हायरसचा साप्ताहिक सरासरी दर 0.53 टक्क्यांवरुन 4.53 पर्यंत वाढला आहे आणि गुजरातमध्ये, साप्ताहिक सकारात्मकता दर 0.07 टक्क्यांवरुन 2.17 टक्क्यांपर्यंत वाढला. याच कालावधीत केरळमधील सकारात्मकता दर 1.47 टक्क्यांवरुन 4.51 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर कर्नाटकात ते 1.65 टक्क्यांवरुन 3.05 टक्के आणि हिमाचल प्रदेशात 1.92 टक्क्यांवरुन 7.48 टक्के झाला आहे. यावरुन असे स्पष्ट होत आहे की, रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. 

मुंबईत एका दिवसात दुप्पट रुग्णसंख्या

राज्यात 450 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झाले आहे. मुंबईत एका दिवसात दुप्पट रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत 'एच3 एन2'च्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कुलाबा, ग्रँट रोड, परळ आणि प्रभादेवी या प्रभागांमध्ये एच3 एन2 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. यासाठी मुंबईतील रुग्णालये देखील सज्ज झालेत.

कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयातील प्रयोगशाळेत दररोज 200 नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे. मात्र या रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत नमुने तपासणीचे 400 संच उपलब्ध केले आहेत. तसेच कस्तुरबा, सायन, केईएम, कूपर आणि नायर रुग्णालयासह 17 उपनगरीय रुग्णालंयामध्ये विलगीकरण खाटांची सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच जीवनरक्षक प्रणालीही सज्ज ठेवली आहे.