परभणी : कोरोना विषाणूचा राज्यात कहर सुरू आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. परभणी जिल्ह्यातही कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी पुढील 15 दिवस वाढवण्यात आली आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांचा आक़डा लक्षात घेता. काही जिल्ह्यांध्ये कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत, परभणीमध्येदेखील रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
ही संचारबंदी 1 एप्रिल रोजी संपणार आहे. परंतु परभणी जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा विचार करता ही संचारबंदी 15 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यात 10 वी आणि 12 वी चे वर्ग वगळता सर्व शाळा, धार्मिक प्रार्थना स्थळे, आठवडी बाजार, सामाजिक राजकीय धरणे आंदोलन, मोर्चे, कोचिंग क्लासेस यावर कडक निर्बंध असणार आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यातून येणारी वाहने प्रवासी यांच्यावरही 15 एप्रिलपर्यंत बंदी असणार आहे.