राज्यात कोरोनाचे एकाच दिवशी ६५ मृत्यू, २,२५० नवे रुग्ण

महाराष्ट्रामध्ये आजच्या एकाच दिवशी कोरोनाच्या ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. 

Updated: May 20, 2020, 09:08 PM IST
राज्यात कोरोनाचे एकाच दिवशी ६५ मृत्यू, २,२५० नवे रुग्ण title=

 

मुंबई : महाराष्ट्रामध्ये आजच्या एकाच दिवशी कोरोनाच्या ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर २,२५० नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३९,२९७ एवढी झाली आहे. तर एका दिवसात ६७९ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं आहे. आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातला कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,३९० एवढा झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. 

राज्यात आज झालेल्या ६५ मृत्यूंपैकी मुंबई मध्ये ४१, पुण्यात १३, नवी मुंबईमध्ये ३, पिंपरी- चिंचवडमध्ये २, सोलापूरात २, उल्हासनगरमध्ये २ तर औरंगाबाद  शहरात २  मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६  पुरुष तर १९ महिला आहेत. आजच्या ६५ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३२  रुग्ण आहेत तर ३१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ६५ रुग्णांपैकी ४८ जणांमध्ये (७४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोनाची आकडेवारी (कंसात मृत्यू)

मुंबई महानगरपालिका: २४,११८ (८४१)
 

ठाणे: ३०९ (४) 
ठाणे मनपा: १८६५ (३३)
नवी मुंबई मनपा: १५९३ (२७)
कल्याण डोंबिवली मनपा: ६१२ (६)
उल्हासनगर मनपा: १३०
भिवंडी निजामपूर मनपा: ७४ (३)
मीरा भाईंदर मनपा: ३१७ (४)
पालघर:६८  (३)
वसई विरार मनपा: ४०७ (११)
रायगड: २७९ (५)
पनवेल मनपा: २५३ (११)
ठाणे मंडळ एकूण: ३०,०२५ (९५०)

नाशिक: १०५
नाशिक मनपा: ८२ (२)
मालेगाव मनपा: ६८१ (३४)
अहमदनगर: ४६ (५)
अहमदनगर मनपा: १८
धुळे: १३ (३)
धुळे मनपा: ७१ (६)
जळगाव: २३३  (२९)
जळगाव मनपा: ७० (४)
नंदूरबार: २५ (२)
नाशिक मंडळ एकूण: १३४४ (८५)

पुणे: २३५ (५)
पुणे मनपा: ४०४९ (२१५)
पिंपरी चिंचवड मनपा: १९३ (६)
सोलापूर: १० (१)
सोलापूर मनपा:४९५  (२६)
सातारा: १७० (२)
पुणे मंडळ एकूण: ५१५२  (२५५)

कोल्हापूर:१२०  (१)
कोल्हापूर मनपा: १९ 
सांगली: ४९
सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी:  ११६ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ३२२ (५)

औरंगाबाद:१६
औरंगाबाद मनपा: १०६६ (३६)
जालना: ३८
हिंगोली: १०७
परभणी: ६ (१)
परभणी मनपा: ३
औरंगाबाद मंडळ एकूण: १२३६ (३७)

लातूर: ४७ (२)
लातूर मनपा: ३
उस्मानाबाद: ११
बीड: ५
नांदेड: ९
नांदेड मनपा: ७१ (४)
लातूर मंडळ एकूण: १४६ (६)

अकोला: २९ (२)
अकोला मनपा: २८१ (१५)
अमरावती: ८ (२)
अमरावती मनपा:  ११५ (१२)
यवतमाळ: १०२
बुलढाणा:३४ (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:५७७ (३४)

नागपूर: २
नागपूर मनपा: ४२१ (६)
वर्धा: ३ (१)
भंडारा: ७
गोंदिया: ३
चंद्रपूर:  १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ६
नागपूर मंडळ एकूण:  ४४७ (७)
इतर राज्ये: ४८ (११)
एकूण:  ३९ हजार २९७  (१३९०)