मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Updated: Dec 24, 2020, 07:01 AM IST
मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन title=
संग्रहित छाया

मुंबई : ब्रिटनहून (Britain) मंगळवारी आणि बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईत (Mumbai) दाखल झालेल्या प्रवाशांपैकी कोणालाही कोरोना झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण २००० प्रवासी काल येणे अपेक्षित होते. त्यापैकी प्रत्यक्षात आलेल्या १६८८ प्रवाशांपैकी ७४५ प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर मुंबईतून इतर राज्यात गेलेल्या प्रवाशांची संख्या ६०२ आहे. पण एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे नाहीत, ही मुंबई आणि राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या नवीन विषाणूला घाबरण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीत नव्या विषाणूबाबत योग्य ते संशोधन करण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. लस तयार करतोय ती त्यावर परिणाम करू शकते, असेही ते म्हणाले. लसीकरणाबाबत भारत बायोटेक आणि सिरमने केंद्राकडे परवाना मागितला आहे. या कंपन्यांना कधी परवाना द्यायचा आणि कोणत्या कंपनीला कोणती राज्य द्यायची हे केंद्र ठरवणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

ब्रिटनमध्ये सापडला कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार, गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाचे नवे दोन प्रकार समोर, नवा व्हायरस दक्षिण आफ्रिकेतून आल्याचं झाल्याचं उघड. ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी तिसरा नवा प्रकार सापडला आहे. त्याचा उगम दक्षिण अफ्रिकेत झाल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. हा नवा प्रकार नुकत्याच सापडलेल्या कोरोनापेक्षाही वेगाने पसरणारा आहे. त्यामुळे आता दक्षिण अफ्रिकेतील प्रवासावर बंदी घातली गेली आहे. 

दरम्यान,  ब्रिटनचे वैज्ञानिक दक्षिण पूर्व इंग्लंडमधील एका प्रयोगशाळेत विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत संशोधन सुरु करत आहेत. कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारामुळे ब्रिटनच्या अनेक ठिकाणी बंदीचा सामना करावा लागत आहे. ब्रिटनमध्ये बुधवारी संसर्गाचे ३६,८०४ बाधित सापडले आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इतके बाधित समोर आले आहेत.