राज्यात आज अनेक भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

Updated: Apr 28, 2020, 08:44 PM IST
राज्यात आज अनेक भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ title=

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ सुरुच आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबईत अधिक आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना सुरु आहेत. देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. पण त्यानंतर ही लॉकडाऊन वाढणार का याबाबत लोकांच्या मनात प्रश्न आहे. आज राज्यात अनेक भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 

दिवसभरात किती रुग्ण वाढले

- नवी मुंबईमध्ये आज रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ झाली आहे. एकाच दिवसात 43 रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या 188 वर पोहोचली आहे.

- रायगडमध्ये कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ८१ वर पोहोचली असून आतापर्यंत ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- बदलापूरमध्ये आणखी जण 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. येथे रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली असून रामेशवाडी आणि कात्रप प्राणजी परिसर सील करण्यात आला आहे.

- यवतमाळमध्ये आणखी ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. येथे रुग्णांची एकूण संख्या 75 वर पोहोचली आहे.

- धारावीत आज कोरोनाचे ४२ रुग्ण वाढले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३३० वर पोहोचली आहे.

- दादरमध्ये कोरोनाचे ४ रूग्ण वाढले असून एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे.

- अमरावतीत दिवसभरात कोरोनाचे 4 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनाच्या रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

- मालेगावात आज एकाच दिवसांत ४४ रुग्ण वाढले आहेत. मालेगाव मनपा भागात १७१ बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत ७ जण बरे झाले तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

- कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचे आणखी 6 रुग्ण वाढले आहेत. त्यापैकी 5 जण रोज मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी प्रवास करणारे आहेत.