अनिरुद्ध दवाळे / अमरावती : (Amravati) जिल्ह्यात कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात 600 नवे रुग्ण आढळून आले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता लोकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. सध्या अमरावती (Amravati) शहरात चार ठिकाणी कोवि़ड-१९ (Covid-19) चाचणी सेंटर आहेत. त्यातील अमरावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरात कोरोना चाचणीसाठी (corona testing) लोकांनी मोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळाले आहे.
विदर्भातील वर्धा अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा निर्णय होण्याची शक्यता अधिक आहे. या जिल्ह्यांत कोरोना पॉझिटिव्ह रेट 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुरु करण्यात आलेली शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेयत. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र न येण्याचे आदेश दिले आहेत. औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ आजपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहणार सुरू राहणार आहेत. तसेच लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींचं बंधन असणार आहे.
अमरावतीत 56 टक्के, भंडाऱ्यात 26 टक्के, अकोल्यात 22 टक्के तर बुलडाण्यात 26.5 टक्के दर नोंदवण्यात आला आहे. कोकणात सिंधुदुर्गातही रूग्णवाढीचा दर 44 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर वाशिम जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आलीय. सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आजपासून बंद करण्यात आलेत. सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.