कोरोनाचा उद्रेक । संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काटेरी कुंपण टाकून सीमा सील

कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.  

Updated: Apr 30, 2021, 09:21 AM IST
कोरोनाचा उद्रेक । संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काटेरी कुंपण टाकून सीमा सील title=
प्रतिकात्मक छाया

 अमरावती : कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यानुसार कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणजे जिल्हा सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसेच आंतरजिल्हाही सीमा सील करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलिसांनी मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकून सीमा सील करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून ४० किलोमीटर लांब असलेल्या, बेरागड गावाच्या सीमेवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलिसांनी, मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकून दोन्ही राज्याच्या असलेला मुख्य रस्ता बंद केला आहे. 

कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' संदर्भाने कडक निर्बंध लागू केले आहे. त्या अनुषंगाने अमरावती शहर व ग्रामीण पोलीस दलातर्फे पोलीस ठाणे निहाय चोख बंदोबस्त व शहराच्या सीमावर्ती भागात चेक पोस्ट व सतर्क नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. 

सीमावर्ती भागात कायदा व सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कामानिमित्त आंतरराज्य किंवा आतरजिल्ह्यात जाण्याकरिता ई पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर ई पास प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.