पुणे : बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ३१३ जणांचा समावेश आहेत. यात महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी या सर्व लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आणले. या ठिकाणी त्यांना योगासन करण्याचे धडे शिकवलेत. तसेच त्यांना सामूदायिक शपथ दिली.
BreakingNews । पुणे बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची मोठी कारवाई । कारवाईत ३१३ जणांचा समावेश । सर्वाना एकत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आणून दिले योगासनाचे धडे । सामूदायिक दिली शपथ । बारामती पोलिसांची अनोखी कारवाई @ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 21, 2020
पुणे, बारामती टाउन में पुलिस ने लॉकडाउन का उल्लंघन करने वालों से सोशल डिस्टेंस का पालन करवाते हुए डॉ. बाबासाहेब अम्बेडकर क्रिकेट स्टेडियम में योग करवाया। pic.twitter.com/edPyJOWRwm
— ANI_HindiNews (@AHindinews) April 21, 2020
संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकां घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एवढे करुनही लोक घराबाहेर पडत आहेत.
पुणे । बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई #CoronaVirus #Covid19 #PuneFightsCovid19 #punepolice@CMOMaharashtra @rajeshtope11 @ashish_jadhao @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/pHDx6ZIYbU
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 21, 2020
बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी हे लोक घराबाहेर पडले होते. शहरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून या लोकांना ताब्यात घेतले आहे.