वादग्रस्त वक्तव्य : अभिनेत्री कंगना विरोधात कोल्हापूर पोलिसात तक्रार

 वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणौवत (Actress Kangana Ranaut ) हिच्याविरोधात पोलिसात तक्रार (complaint) दाखल करण्यात आली आहे. 

Updated: Nov 18, 2021, 08:56 AM IST
वादग्रस्त वक्तव्य : अभिनेत्री कंगना विरोधात कोल्हापूर पोलिसात तक्रार   title=
संग्रहित छाया

 कोल्हापूर : Kangana Ranaut Controversial statement: वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणौवत (Actress Kangana Ranaut ) हिच्याविरोधात पोलिसात तक्रार (complaint) दाखल करण्यात आली आहे. कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (Controversial statement: Police complaint against actress Kangana Ranaut)

काँग्रेसचे शहराध्यक्ष  (Congress city president) सचिन चव्हाण ( Sachin Chavan) आणि संजय वाईकर (Sanjay Waikar) यांनी शाहूपुरी पोलिसात अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसतर्फे विविध पोलीस ठाण्यात कंगना हिच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे.

'भिक मागून स्वातंत्र्य....'

कंगना रानौत हिच्या (Kangana Ranaut) 'भिक मागून स्वातंत्र्य मिळाले आहे' या विधानावरचा वाद थांबत नाही तोच तिने पुन्हा एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. कंगना रानौतने सोशल मीडियावर महात्मा गांधींना भुकेले आणि धूर्त संबोधणारी पोस्ट शेअर केली आहे. भगतसिंहला फाशी द्यावी अशी महात्मा गांधी यांची इच्छा होती, असेही त्यांनी म्हटले होते. कंगनाने इंस्टा स्टोरीवर एका जुन्या वृत्तपत्रातील एक लेख शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्ही एकतर गांधींचे चाहते किंवा नेताजींचे समर्थक असू शकता. तुम्ही दोघांचे असू शकत नाही. ते तुम्हीच ठरवा.

गालावर थप्पड मारून स्वातंत्र्य मिळाले नाही! 

कंगनाने लिहिले आहे की, 'ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांना त्यांच्या मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. कारण त्यांच्यात ना हिम्मत होती ना रक्त उकळले होते. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते. हे तेच लोक होते ज्यांनी आम्हाला शिकवले की, जर कोणी तुमच्या एका गालावर थापड मारली तर दुसरा गाल त्याच्यासमोर ठेवा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशा माणसाला स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मिळते, हुशारीने तुमचा नायक निवडा.

या विधानावरुन गदारोळ झाला

कंगना रानौत हिने (Kangana Ranaut) नुकतेच एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात सांगितले होते की, 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही तर भिक मिळाली. कंगना रानौत म्हणाली की, प्रत्यक्षात 2014  मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर खरे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कंगनाच्या या विधानावर लोकांनी आक्षेप घेतला होता.