'आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जातंय'; अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण

शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलांची नावं समोर आली आहेत. टीईटी अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

Updated: Aug 8, 2022, 12:46 PM IST
'आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जातंय'; अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण title=

औरंगाबाद : शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलांची नावं समोर आली आहेत. टीईटी अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. उजमा, हुमा, हीना अशी मुलींची नावं आहेत तर अमीर सत्तार असं मुलाचं नाव आहे. या चारही जणांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द झालंय. 'पण, माझ्या मुलानं परीक्षा दिलीच नाही मग अपात्र यादीच नावच आलं कसं?' असा सवाल उपस्थित केला आहे. तर मुली परीक्षेत नापास झाल्या होत्या, आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं सत्तारांनी म्हटलंय...

'माझ्याकडे काल शिक्षक भरती प्रक्रियेतील अपात्र उमेदवारांची यादी आली होती. मी स्वतःच त्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. माझी बदनामी करण्याची प्रयत्न सुरू आहे. यादीत मुलींची नावं कोणी टाकली, याबाबत मी कायदेशीर कारवाई करणार' असे सत्तार यांनी म्हटलंय.

'याप्रकरणात माझ्या कुटूंबियांकडून किंवा शिक्षण संस्थेकडून चुकीचे घडले असेल तर, मुख्यमंत्री आणि सचिवांकडे चौकशीची मागणी करणार. माझ्या मुली त्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. याव्यतिरिक्त माझ्या मुलांनी कधीही TET परीक्षा दिलेली नाही. त्यामुळे त्याचाही या प्रकरणाशी संबध नसताना त्यांचेही नाव यादीत कसे आले?' असा सवाल सत्तार यांनी केला आहे.

टीईटी वापर एकतर पगार मिळण्यासाठी किंवा नोकरीसाठी करतात. याबाबत या घोटाळ्यामागे कोण सूत्रधार आहे हे समोर यायला हवं. याप्रकरणी  ईडी चौकशी सुरू केली आहे. माझ्या मुलीने जर अर्ज केला असेल तर ते गुन्हेगार ठरतील पण त्यांनी तसं काहीही केलं नाही. असेही सत्तार यांनी म्हटलं.