अमरावती : अमरावती येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी अशोक चव्हाण यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केलं. यावेळी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
भाजप सरकार हे कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी १२ डिसेंबरला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेकाप या पक्षांतर्फे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. नागपूरला विधान भवनावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
गुलाम नबी आझाद या मोर्चाचं नेतृत्त्व करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तर या मोर्च्याला शरद पवार यांच्यासह इतर मोठी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
केंद्र आणि राज्यातील सरकार हे खोटारडं असून शेतक-यांसह सर्वसामान्यांची फसवाफसवी या सरकारन चालवलीय. खोटं बोल पण रेटून बोल एव्हढाच उद्योग या सरकारनं चालवल्याचा घणघात खासदार सुप्रिया सुळे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज यवतमाळमधून हल्लाबोल मोर्चा सुरू होणार आहे. ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर मोर्चा धडक देईल. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.