नाशिक : नारायण राणेच नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादीमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसमधले मोठे नेते भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यामुळेच काँग्रेसमुक्त भारत ही भाजपची घोषणा पूर्ण होईल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते नारायण राणे हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरू आहेत. गणपतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राणेंच्या घरी गेले होते. यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखी जोर धरला होता.