राजकीय वर्तुळात शोककळा! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचं निधन

इंदिरा गांधींपासून सोनिया गांधींपर्यंत नंदूबारचा बालेकिल्ला मजबूत करणाऱ्या कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन 

Updated: Sep 17, 2022, 03:21 PM IST

नंदूरबार : राजकीय वर्तुळातून सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित (manik roa gavit) यांचे निधन झाल्याची घटना घडलीय. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुली, एक मुलगा असा परीवार आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर अनेक राजकिय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. 

प्रखर आदिवासी नेते म्हणून माणिकराव गावित (manik roa gavit) यांची ओळख होती. सुमारे अर्धशतकापर्यंत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, याचे श्रेय माणिकराव गावित यांना जाते. तसेच इंदिरा गांधींपासून ते सोनिया गांधींपर्यंतच्या काळात ते आपल्या भागात काँग्रेसला मजबूत ठेवण्यात यशस्वी ठरले होते. ते सलग 9 वेळा कॉग्रेसचे खासदार राहिले आहेत. 

...म्हणून इंदिरा गाधी नंदुरबारची निवड करायच्या
इंदिरा गांधी प्रत्येक वेळी निवडणुकीपूर्वी नंदुरबारमधून प्रचाराची सुरुवात करत असत. काँग्रेसचे सरदार म्हणून माणिकराव गावित (manik roa gavit) त्यांच्यासाठी काम करत असत. तसेच नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे.

नंदूरबारमध्ये सोनिया गांधी यांची पहिली सभा

सोनिया गांधी यांचेही नंदुरबारशी विशेष नाते होते. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांची पहिली भेट येथे झाली होती. तेव्हाही माणिकराव गावित (manik roa gavit) यांनी त्यांना खूप मदत केली होती. माणिकराव गावित यांचा नंदुरबारच्या राजकारणात नेहमीच दबदबा राहिला आहे.9 वेळा ते येथून खासदार होते, 2 वेळा ते केंद्रात राज्यमंत्री होते. 

माणिकराव गावित (manik roa gavit) यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.